सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची तातडीने पूर्तता करावी – दादा कुडतरकर

कणकवली पं स मध्ये सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांसोबत केली सविस्तर चर्चा

कणकवली (प्रतिनिधी) : तालुका पेन्शनर्स असोसिएशन संघटनेने अध्यक्ष सिताराम उर्फ दादा कुडतरकर यांच्या नेतृत्वाखाली 24 सप्टेंबर रोजी कणकवली पंचायत समिती गट विकास अधिकारी  यांचे दालनात पेन्शनरांच्या समस्या संबंधात सहाय्यक गटविकास अधिकारी श्री सूर्यकांत वारंग  यांचे समवेत सकारात्मक चर्चा केली.त्यामध्ये सातवा वेतन आयोगाच्या 4थ्या व 5 व्या हप्त्याची प्रलंबित  देय रक्कम, 80 वर्षावरील पेन्शनरांना द्यावयाचा 20% वाढीव पेन्शनचा लाभ, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये प्रलंबित पेन्शनच्या केसेस, गट विमा योजना इतर लाभ , पी. पी. ओ. बाबत आवश्यक नोंदी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी श्रीमती सुजाता सावंत यांचे प्रलंबित क्लेम बाबत न्यायालयाच्या निकालानुसार कारवाईची आवश्यकता इत्यादी बाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली चर्चेच्या वेळी  असोसिएशनचे अध्यक्ष श्री दादा कुडतरकर ,उपाध्यक्ष श्री मनोहर पालेकर ,श्री राजस रेगे, सचिव श्री विलास चव्हाण ,सहसचिव सुगंधा देवरुखकर, पूजा सावंत, ज्ञानेश पाताडे , सत्यवान धुरी, श्री देऊलकर , केशव पावसकर, महादेव चव्हाण इत्यादी सेवा निवृत्त कर्मचारी तसेच  पं. स चे.सहा. प्रशासन अधिकारी  श्रीमती बर्डे मॅडम,श्रीमती नीलम जाधव. सहा.लेखा  अधिकारी श्री तांबे साहेब व श्री धुरी ,तसेच  प.स.च्या इतर विभागाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!