शिवतेजा मित्रमंडळाचे 18 रोजी विविध कार्यक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ बाजारपेठ येथील शिवतेजा मित्रमंडळातर्फे शनिवारी 18 मार्चला पिंपळपार येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी 10 वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी 12.30 वा. आरती व तीर्थप्रसाद, दुपारी 1 ते 3 वा. महाप्रसाद, सायंकाळी 5 ते 7 यावेळेत लहान मुलांसाठी फनीगेम्स व माहिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम, रात्री 7 वा. भैरी ठाणेश्वर प्रासादिक मंडळ कुवळे-आगरवाडी ता. देवगड यांचे वारकरी भजन, रात्री 9.30 वा. शिवतेजा मित्रमंडळ निर्मित व शशिकांत कांबळी लिखित व दिग्दर्शित `मिशन अॅडव्हेंचर’ हे धम्माल बालनाट्य सादर होणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सचिन कुवळेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!