कणकवली- कलमठ प्रीमियर लीग , केजीएन संघ विजेता तर स्वराज उपविजेता

आमदार नितेश राणे यांची उपस्थिति
संदीप मेस्त्री मित्रमंडळचे २० व्या वर्षाचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : संदिप मेस्त्री मित्रमंडळ आयोजीत कलमठ प्रीमियर लीग,क्रेझिबॉयज क्रिकेट स्पर्धेचा सामना केजीएन स्पोर्ट्स विरुद्ध स्वराज स्पोर्ट्स वरवडे याच्यात झाला आशिये माळ मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम दिवशी आमदार नितेश राणे यांनी स्पर्धेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.५दिवस चाललेल्या स्पर्धेला खेळाडू आणि क्रीड़ा रासिकानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

उपांत्य फेरीत साईं स्पोर्ट्स वर केजीएन स्पोर्ट्सने तर विनसम वागदे संघावर स्वराज वरवडे संघाने विजय मिळवत अंतिम फेरीत स्थान पक्के केले. अंतिम सामन्या मध्ये नानेफेक जिंकून केजीएन संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला,.प्रथम फलंदाजी करताना स्वराज वरवडे संघाने ५ षटकात ४८ धावा केल्या प्रसाद गुरव १ षटकार १ चौकार सहाय्याने १९ धावा तर बंड्या साटम याने १० धावा केल्या,रोहित चिंदरकरने १३ धावात २ गड़ी बाद केले, प्रत्युत्तरात खेळताना केजीएन स्पोर्ट्स कलमठ संघाच्या सागर नांदगांवकरच्या ४ चौकार १ षटकार सहित नाबाद २४ धावा, रोहित कांबळे २ चौकार १४ धावा बनवत ३ चेंडू शिल्लक ठेवत ९ गड्यानी विजय प्राप्त करुन केपीएलच्या चषकांवर आपले नाव कोरले. स्पर्धेच्या वैयक्तिक बक्षीसांमध्ये सर्वोत्तम खेळाडू मालिकावीर म्हणून रोहित कांबळे ( केजीएन स्पोर्ट्स,कलमठ) अंतिम सामना सामनावीर सागर नांदगांवकर ( केजीएन स्पोर्ट्स,कलमठ) उत्कृष्ट गोलंदाज हर्ष नांदगांवकर (संकल्प लांजेवाडी) उत्कृष्ट फलंदाज बंड्या साटम ( स्वराज स्पोर्ट्स वरवडे) उत्कृष्ट क्षेत्ररक्षक संकेत राठोड ( केजीएन स्पोर्ट्स,कलमठ) उत्कृष्ट यष्टिरक्षक प्रथमेश चिंदरकर ( साईं स्पोर्टस कलमठ) प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये ३०००० व चषक व द्वितीय पारितोषिक रुपये २०००० व चषक यांना रोख रक्कम व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धे साठि अंतिम दिवशी आमदार नितेश राणें, भाजपा जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे, यांनी भेट दिली. बक्षीस वितरण साठि भाजपा तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, सरपंच संदिप मेस्त्री,माजी नगराध्यक्ष मेघा गांगण, उपसरपंच स्वप्निल चिंदरकर,पपू यादव, दिनेश गोठनकर, श्रेयस चिंदरकर, सुधीर जाधव, गिरीश धूमाळे, विजय चिंदरकर,सचिन पारधिये,सर्वेश दळवी,मिलींद चिंदरकर, चंद्रकांत तेली, श्रीकांत बुचड़े, प्रवीण सावंत, मकरंद वायंगणकर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे आभार व स्वागत संदीप मेस्त्री यांनी केले. पंच म्हणून शकील शेख, राकेश पावसकर, मिलींद गुरव, पंकज कदम, समालोचन अमोल जामदाडे, सागर कदम, रोहन कदम, शुभम मेस्त्री तर गुनलेखक म्हणून योगेश मेस्त्री ,राहुल कदम यांनी काम पाहिले.स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परेश कांबळी, समीर कवठणकर,नितिन पवार, जयेश मेस्त्री, सिद्धेश मेस्त्री, नागेश नायर ,राजू भिसे,सचिन पवार,स्वरूप कोरगावकर,सागर राणे, विराज मेस्त्री, सचिन वाघेश्री, प्रवीण परब, यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!