वैभववाडीत १ ऑक्टोबर रोजी ऐच्छिक रक्तदान दिन साजरा याप्रसंगी १७ रक्तदात्यांनी केले रक्तदान

वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदे’तर्फे दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आरोग्य विभागातर्फे १ ऑक्टोबर रोजी ऐच्छिक रक्तदान दिन साजरा करण्यात येतो. रक्तदानाबाबत समाजात आजही बरेच गैरसमज आहेत. युवा पिढीला ऐच्छिक रक्तदानाकरीता प्रवृत्त करण्यासाठी व रक्तदान ही एक चळवळ म्हणून उभारण्यासाठी दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी जनजागरण अभियानाचे आयोजन करण्यात येते या पार्श्वभूमीवर वैभववाडीत १ ऑक्टोबर रोजी ऐच्छिक रक्तदान दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब वैभववाडी, सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी , आरोग्य विभाग वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने १ ऑक्टोबर २०२४ रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी १७ रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवत रक्तदान केले. वैभववाडीचे तहसिदार सुर्यकांत पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी रोटरी क्लब वैभववाडी अध्यक्ष प्रशांत गुळेकर सचिव सचिन रावराणे.संजय रावराणे मुकुंद रावराणे, संजय सावंत, संजना रावराणे, तेजस आंबेकर, सुरेन्द्र नारकर, मनोज सावंत, पवार, तालुका आरोग्य सहायक अनंत चव्हाण, मधुकर पाटील, सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी अध्यक्ष राजेश पडवळ कार्याध्यक्ष शेखर रावराणे, रिक्षा संघटना जिल्हा उपाध्यक्ष सचिन तळेकर, संजय साळसकर, प्रशांत लाड प्रणय बांदेकर, अनिकेत तांबे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!