लोरे नं 2 येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात स्वच्छता मोहीमेचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैभववाडीच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती लोरे नं 2 येथे साजरी करण्यात आली. जयंतीचे औचित्य साधून  छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात स्वच्छता मोहीम करण्यात आली. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावराम अनावकर, कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, तालुका सचिव गणेश पवार, ओबीसी तालुकाध्यक्ष वैभववाडी शशिकांत मुद्रस ,बाळा माळकर, किशोर राणे ,ज्ञानेश्वर पवार तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!