इनामदार श्री देवी भगवती संस्थान कोटकामते येथे नवरात्राेत्सव

भजन, किर्तन,शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाचे आयाेजन

देवगड (प्रतिनिधी) : इनामदार श्री देवी भगवती संस्थान कोटकामते ता. देवगड यांच्यावतीने दि. ३ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्राेत्सवाचे आयाेजन करण्यात आले आहे.त्यानिमित्त भजन, किर्तन, संगीत गायनाचे कार्यक्रम संपन्न हाेणार आहेत.नित्यक्रमाने पहाटे 5 वा. काकड आरती,सकाळी ६ ते ७ वा. श्रीची महापू‌जा,दुपारी 12 वा. व संध्याकाळी 4 ते 5 सनई चाैघडा,संध्याकाळी 5 ते 7 शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाची बैठक,रात्री 9.30 ते 11 वाजता आरती, पालखी फेरी, सनई वादन, पान सुपारी, रात्री 11 ते 12 किर्तन, रात्राै 12 श्रींचा संचार आदी कार्यक्रम हाेणार आहेत.

शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाची बैठक
दि.6,7,8 ऑक्टोबर राेजी पं.मुकूंद क्षिरसागर, 8 ऑक्टोबर राेजी प्रियांका वेलणकर, 9 ऑक्टोबर राेजी पं अजित गाेसावी,कमलाकर पाटकर, महेंद्र मेस्त्री.तसेच नामवंत भजनी बुवा प्रमाेद बुवा, श्रीधर मुणगेकर,संदीप लाेके, संताेष जाेईल आदींची सुश्राव्य भजने हाेणार आहेत.याशिवाय 5 ऑक्टोबर राेजी मिठबाव येथील महिलांचे भजन, 9 ऑक्टोबर राेजी समर्थ समई नृत्य पथक, जुईवाडी खुडी,13 ऑक्टोबर राेजी चारही शिवकळा साेबतचा संस्थानिक थाटाचा साेने लुटण्याचा कार्यक्रम.

3 ते 12 ऑक्टोबर कालावधीत किर्तन महाेत्सव
3 व 10 ऑक्टोबर राेजी महेंद्र पंतमिराशी, 4 व 5 ऑक्टोबर राेजीमृणाल गावकर, 6 ऑक्टोबर राेजी किरण पारकर. 7 व 8 ऑक्टोबर राेजी गाेविंद आसाेलकर, 9 ऑक्टोबर राेजी स्नेहलदिप सामंत, 11 व 12 ऑक्टोबर राेजी कमलाकर पाटकर आदींची किर्तने हाेणार आहेत.

सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहुन कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त मंडळ, मानकरी वर्ग, देवसेवक आणि समस्त ग्रामस्थ इनामदार श्री देवी भगवती संस्थान कोटकामते ता. देवगड यांनी केले आहे.

error: Content is protected !!