कलमठ गावातील जीर्ण विद्युत पोल बदलले

जि. प. सदस्या सुप्रिया मेस्त्री यांच्या प्रयत्नांना यश

कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ ग्रामपंचायत हद्दीत असलेले महावितरणने जीर्ण व धोकादायक स्थितीतील विद्युत पोल काढून त्या जागी नवीन पोलांची उभारणी केली आहे. कलमठ गावातील महावितरणच्या जीर्ण व धोकादायक विद्युत पोलांमुळे त्या परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. ही बाब जि. प. सदस्या सुप्रिया मेस्त्री यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गावातील धोकादायक असलेले व जीर्ण झालेले विद्युत पोल बदलून त्या जागी नवीन विद्युत उभारण्यात यावेत, यासाठी सुप्रिया मेस्त्री यांनी पालकमंत्री नितेश राणे, महावितरणच्या अधिकाºयांकडे पाठपुरवठा केला होता. मंत्री नितेश राणे यांनी कलमठमघील धोकादायक व जीर्ण झालेले विद्युत पोल बदलून त्याठिकाणी नवीन पोल उभारण्याची सूचना महावितरणच्या अधिकाºयांना केली होती. त्यानुसार अधिकाºयांनी कामगारांच्या मदतीने सदर पोल काढून त्या ठिकाणी नवीन पोल उभारले आहेत. कलमठ बाजारपेठ, कुंभारवाडी, बिडयेवाडी या परिसरातील १० हून अधिक काढून त्याठिकाणी नवीन पोल उभारण्यात आले आहे. सदर पोल बदल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!