सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, एचडीएफसी बँकेतर्फे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान व एचडीएफसी बँकेची कणकवली शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा रक्तपेढी, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने शुक्रवार ३० आॅक्टोबर रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १.३० यावेळेत कणकवली नगरपंचायतीच्या बहुउद्देशीय सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिबिराच्या माहितीसाठी तन्वी भट, सागर लाड, स्नेहल हजारे, अमोल भोगले, मिहिर तांबे, सुशील परब, दुर्गप्रसाद काजरेकर यांच्याकडे संपर्क साधावा.












