देवगड तालुक्यातील उ.बा.ठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा आ. नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

आ. नितेश राणेंच्या माध्यमातून होणा-या विकास कामांना प्रभावित होवुन केला प्रवेश ; उ.बा.ठा सेनेला बसला धक्का

देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यात भाजपा आ. नितेश राणेंच्या माध्यमातून होत असलेली विकास कामे पाहून ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विकासाला समर्थन देत भाजपात आ.नितेश राणे यांच्या उपस्थित प्रवेश केला.यावेळी ठाकरे शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक माजी सरपंच उदय साटम, नाद शेवरे सोसायटी संचालक सुरेश राणे,धनगर समाजाचे लक्ष्मण कोकरे यांनी भाजपात प्रवेश केला. या प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांचे आ. नितेश राणे यांनी स्वागत केले.

यावेळी माजी आमदार अजित गोगटे , सरपंच संदीप देवलकर, दीपक परब, रामकृष्ण राणे, सतीश घाडीगावकर , तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, संदीप साटम आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!