असलदे पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त कार्यभार नांदगाव पोलीस पाटलांकडे

कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे आदेश; ग्रामस्थांच्या मागणीला यश, वृषाली मोरजकर यांचा सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : असलदे गावातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त कार्यभार अखेर नांदगाव येथील पोलीस पाटील वृषाली ऋषिकेश मोरजकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. कोळोशी येथील पोलीस पाटलांकडे असलेला अतिरिक्त कार्यभार गावापासून अंतरामुळे नागरिकांना गैरसोयीचा ठरत असल्याने जवळच्या नांदगाव येथील पोलीस पाटलांकडे कार्यभार देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. या मागणीची दखल घेत कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी आदेश काढला.
असलदे ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. देशसेवा करणाऱ्या भारतीय सैनिकांप्रती सद्भावना व्यक्त केल्यानंतर प्रभारी पोलीस पाटील म्हणून वृषाली मोरजकर यांनी पदभार स्वीकारला. यानंतर ग्रामस्थांच्या वतीने सरपंच चंद्रकांत डामरे आणि चेअरमन भगवान लोके यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपसरपंच सचिन परब, व्हा. चेअरमन दयानंद हडकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष श्रीकृष्ण परब, सोसायटी संचालक शत्रुघ्न डामरे, परशुराम परब, विजय आचरेकर, संतोष परब, विजय डामरे, महेश लोके, रघुनाथ लोके, अनिल नरे, प्रशांत परब, वासुदेव दळवी, पत्रकार ऋषिकेश मोरजकर, बाबाजी शिंदे, ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा दळवी, सपना डामरे, आनंदी खरात, विद्या आचरेकर, संतोष घाडी, सुदीन तांबे, एकनाथ डामरे, अनंत परब, गवस साटविलकर, तलाठी माधुरी काबरे, ग्रामसेवक संजय तांबे, कर्मचारी मधुसुदन परब, सत्यवान घाडी, प्रकाश वाळके, प्रतीक्षा परब, शिक्षक जंगले, शिक्षिका अर्चना लोके, विनिता सावंत, आशा सेविका भाग्यश्री नरे, अंगणवाडी सेविका कोमल परब आदी ग्रामस्थ व कृषीमित्र उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व राज्यगीत गायन केले.
असलदे पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त कार्यभार यापूर्वी कोळोशी येथील पोलीस पाटील संजय मारुती गोरुले यांच्याकडे होता. मात्र कोळोशी हे गाव असलदेपासून अंतरावर असल्याने नागरिकांना पोलीस पाटील दाखले तसेच विविध प्रशासकीय कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे ग्रामस्थांनी असलदेसाठी स्वतंत्र पोलीस पाटील व्यवस्था करावी किंवा जवळच्या गावातील पोलीस पाटलांकडे अतिरिक्त कार्यभार सोपवावा, अशी मागणी केली होती.
नांदगाव येथील पोलीस पाटीलांकडे अतिरिक्त कार्यभार सोपविल्यामुळे असलदे ग्रामस्थांची विविध कामांसाठी होणारी गैरसोय कमी होणार आहे. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन प्रशासकीय पातळीवर कार्यवाही केल्याबद्दल कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे तसेच संबंधित प्रशासनाचे ग्रामस्थांनी आभार मानले. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे हा प्रश्न मार्गी लागल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

error: Content is protected !!