निलेश राणे शिवसेना पक्षप्रवेश सोहळा

निलेश राणे कुडाळ मालवण चे फिक्स आमदार

नितेश राणेंनी केली गर्जना

कुडाळ (प्रतिनिधी) : आज 23 ऑक्टोबर ला होणाऱ्या निर्णयाचे पडसाद 23 नोव्हेंबर रोजी दिसणार आहेत. निलेश राणे हे भावी आंमदार नसून पुढील काळातील फिक्स आमदार आहेत असा विश्वास भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. 8 वर्षे सत्ताधारी असलेले वैभव नाईक आणि केवळ 2 वर्षे सत्तेत असलेला मी आमदार म्हणून दोन्ही मतदारसंघात कुडाळ मालवण पेक्ष्या तिप्पट विकासनिधी मी आणला आहे. हवे तर वैभव नाईक यांनी खुल्या व्यासपीठावर यावे.बस झाला आता वैभव नाईक नावाचा भंपकपणा असे म्हणत आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यावर हल्लाबोल केला.मागील 10 वर्षांचा या मतदारसंघात काय काम केले ? स्थानिक आमदारांनी विधानसभेत काय प्रश्न मांडले ? 10 पैकी 8 वर्षे सत्ताधारी आमदार असलेल्या नाईक यांनी कुडाळ मालवण मतदारसंघाचा विकास झाला काय ? त्यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असूनही ह्या मतदारसंघाचा विकास का होऊ शकला नाही ? वैभव नाईक यांनी कधीतरी मालवण मधील मच्छीमारांसाठी विधानसभेत प्रश्न का का मांडले नाही ? एलईडी पर्ससीन नेट मच्छीमारी चा प्रश्न सोडवून पारंपरिक मच्छीमाराना न्याय का देऊ शकले नाहीत ? ह्या प्रश्नांची उत्तरे वैभव नाईक यांना मतदारांनी विचारावीत. जेव्हा नारायण राणे साहेब विधानसभेत बोलायचे तेव्हा कुडाळ मालवण चे आमदार बोलतोय हे जाणून विधिमंडळ ऐकायचे. अपघाताने आमदार झालेले वैभव नाईक विधिमंडळात कमी आणि कॉरिडॉर मध्ये गप्पा मारत असतात. नुसता घरात आमदार येऊन आपल्या मतदारसंघाचे घरचे प्रश्न सुटत नाहीत.अधिकारी आणि प्रशासनावर धाक असला पाहिजे. या मतदारसंघात खासदार असताना निलेश राणे यांनी अनेक रस्ते बनवले. कुडाळ मालवण च्या जनतेने विकासाच्या प्रक्रियेत मागे राहू नये. जसा कणकवली आणि सावंतवाडी मतदारसंघाचा विकास होत आहे तसा विकास कुडाळ मालवण चा व्हायचा असेल तर या मतदारसंघाचे नेतृत्व निलेश राणेंसारख्या खमक्या नेतृत्वला आमदार म्हणून निवडून द्या. महायुती सरकार मुळे लाडक्या माता भगिनी दिवाळी गोड साजरी करणार आहेत.नोव्हेंबर महिन्यापर्यंत चा लाडकी बहीण योजनेचा हफ्ता बँक खात्यात जमा झाला आहे. डिसेंम्बर पासून दरमहा दीड हजार चा हफ्ता बँकेत जमा व्हायचा असेल तर धनुष्यबाण निशाणी समोरील बटन दाबून निलेश राणेंना निवडून द्या. उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात म्हणालेत की त्यांचे सरकार आले की पहिल्या 11 दिवसांत महिलांना दरमहा दीड हजार देणारी लाडकी बहीण योजना बंद करणार . जेव्हा वैभव नाईक तुमच्या दारात प्रचाराला येतील तेव्हा त्यांना याचा जाब विचारा असे आवाहन नितेश राणे यांनी केले.

error: Content is protected !!