प.पू.भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या.खारेपाटण च्या कणकवली शाखेचा शुभारंभ संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : प.पू.भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या.खारेपाटण या संस्थेच्या कणकवली येथील नव्या व पहिल्या विस्तारित शाखेचा शुभारंभ आज गुरवारी सकाळी ११.३० वाजता संस्थेचे चेअरमन नासीर भाई काझी यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले.

कणकवली एस टी बसस्थानक समोरील येथील एकदंत प्लाझा या इमारतीत शुभारंभ करण्यात आलेल्या प.पू.भालचंद्र महाराज नागरी सह.पतसंस्था मर्या.खारेपाटण च्या कणकवली शाखा कार्यालय शुभारंभ प्रसंगी संस्थेचे प्रवर्तक सूर्यकांत शेट्ये यांच्या कन्या सुकन्या टोपले,व्हॉईस चेअरमन राजेंद्र ब्रम्हदंडे,संचालक प्रवीण लोकरे,संतोष पाटणकर,श्रद्धा देसाई,विजय कुडतरकर, संतोष हरयान,राजेश वारंगे, नंदकिशोर कोरगावकर,राजेंद्र वरुणकर,परवेज पटेल,सौ मनस्वी कोळसुलकर, भावेश कर्ले,संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम मोरे,कणकवली शाखा अधिकारी विजय बागवे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई,माजी संचालक,आर टी मर्गज कणकवली नगरसेवक अभी मुसळे,कणकवली नायब तहसीलदार संभाजी खाड्ये,बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खारेपाटण चे मॅनेजर गणेश शिवथरे,राजापूर अर्बन बँकेचे वैभववाडी शाखेचे मॅनेजर श्री पवार तर तळेरे शाखेचे दुर्गेश बिर्जे,गणेश प्रिंट चे मालक विनोद मर्गज,चौंडेश्र्वरी सहकारी पतसंस्था कणकवलीचे विलास बुचडे,खारेपाटण सोसायटीचे व्हॉईस चेअरमन सुरेंद्र कोरगावकर, सचिव – अतुल कर्ले खारेपाटण प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिय वडाम,वैष्यवाणी सहकारी पतसंस्था खारेपाटण शाखेचे वीरेंद्र चीके, सामाजिक कार्यकर्ते महेश कोळसुलकर,दादा कर्ले,मोहन कावळे,शरद कर्ले,विजय कळत्रे,संजय शेट्ये,वर्षा ब्रम्हदंडे,सुधाकर कर्ले, खारेपाटण व्यापारी असो अनंत गांधी, ऍडव्होकेट संकेत देवस्थळी, सी.ए.सुहास पालव, व्यवसायिक जितेंद्र खामकर,लियाकत काझी आदी मान्यवर मंडळी तसेच विविध संस्थांच्या पदाधिकारी यांनी उद्घघाटन प्रसंगी संस्थेच्या नूतन कार्यालयाला भेट देऊन पुढील वाटचालीस शुभेछा दिल्या.

“प.पू.भालचंद्र महाराज नागरी सह.पतसंस्था मर्या.खारेपाटण या संस्थेने ३५ व्या वर्षात पदार्पण केले असून प.पू.भालचंद्र महाराज यांच्या नावाने खारेपाटण येथे कार्यरत असलेल्या या संस्थेचा नवीन पहिल्या शाखेचा शुभारंभ प.पू. भालचंद्र बाबांच्या कणकनगरीत होत याचा आम्हाला सार्थ आभिमान असून यापुढील संस्थेच्या सहकारचे जाळे संपूर्ण जिल्हाभर आपण विनणार असल्याचे भावपूर्ण उदगार संस्थेचे चेअरमन नासीर काझी यांनी कणकवली शाखेच्या शुभारंभ प्रसंगी काढले.”

error: Content is protected !!