कणकवली हर्णे आळी येथील नवीन हर्णे यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील हर्णेआळी येथील रहिवाशी तसेच वनिता मोबाईल शॉपीचे मालक नवीन विनोद हर्णे (४२) यांचे शनिवारी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

नवीन यांचे व्यक्तिमत्व हरहुन्नरी होते.हर्णेआळी येथील समाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा महत्वपूर्ण सहभाग असे. त्यांच्या मितभाषी व मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा मित्र परिवारही मोठा होता.त्यांच्या आकस्मिक निधनाने अनेकांनी हळहळ व्यक्त केली. त्यांच्या पश्चात आई,पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, वहिनी असा परिवार आहे. वीज महावितरण कंपनीचे इंजिनियर सचिन व प्राथमिक शिक्षक भूषण यांचे भाऊ,तर सामाजिक कार्यकर्ते गौरव हर्णे यांचे ते चुलत बंधू होत. त्यांच्यावर शनिवारी सायंकाळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

error: Content is protected !!