संकल्प संस्था, कलारंग प्रोडक्शन व कोकण टॉकीज या युवा समुहांनी समर्थ आश्रमातील बांधवांसाठी केले मोलाचे सहाय्य

युवक – युवती व नागरिकांनी समर्थ आश्रमातील बांधवांसह साजरा केला दिवाळीचा आनंद

खारेपाटण (प्रतिनिधी) : आपल्या माणसांच्या समाजात समाजातील निराधार वंचित, दुःखी कष्टी लोकांसाठी अनेक सेवाभावी कार्यकर्ते आश्रमांद्वारे कार्य करीत असतात. निराधार वंचितांना जीवनात आधार देवून त्यांचे अश्रू पुसण्याचे मानवतेचे कार्य ही मंडळी करीत असतात. मात्र हे आश्रम चालण्यात महत्वाचा सहभाग असतो तो समाजातील स्यवंसेवी वृत्तीच्या संवेदनशील नागरिकांचा.नुकताच संकल्प संस्था कलारंग प्रोडेक्शन व कोकण टॉकीज जीवन आनंद या युवा समूह संस्थांनी समर्थ आश्रमाधील निराधार बंधवांसोबत दिवाळी सण आनंदात साजरा केला.
संस्थेचे संस्थापक संदिप परब यांनी सुरू केलेले मुंबई, पालघर , सिंधुदुर्ग सह गोवा राज्यातील आश्रम आणि शेल्टर होम देखील असेच देणगीदार, हितचिंतक, सर्वसामान्य युवक आणि नागरिकांच्या पाठिंब्यावर सुरू आहेत. या आश्रमांपैकीच एक वसईतील विरारफाट्याचा समर्थ आश्रम आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही युवक आणि नागरिकांच्या अनेक समुहांनी आश्रमात असलेल्या देशभरातील बांधवांसाठी सहाय्य प्रदान करून बांधवांबरोबर दिवाळीचा आनंद साजरा केला.
मुंबई स्थीत युवक अमोल भाताडे यांनी सुरू केलेली संकल्प संस्था ,कलारंग प्राँडक्शन समुह आणि कोकण टाँकीज या कलावंताच्या समुहात सक्रीय असलेल्या सर्वसामान्य कुटुंबांतील ३० युवक युवतींनी त्यांच्या सामुहिक सहभागातून आश्रमसाठी आवश्यक किराणा साहित्य , इन्व्हर्टर, बँटरी व प्लँस्टिक खुर्च्या हे साहित्य प्रदान केले. आश्रमातील बांधवांच्या भेटी घेवून त्यांचेशी हितगुज केले. कोकणी निखील चँनेलचे निखील सकपाळ व संकल्पचे अध्यक्ष रंजित भाताडे यावेळी सहभागी होते.
त्याचप्रमाणे दिवाळीच्या पुर्वसंध्येला मुंबई येथील एसएनडिटी विद्यापीठाच्या लाईफ लाँग लर्निंग आणि डिपार्टमेंट आँफ सोशल वर्क च्या विद्यार्थीनींनी आश्रमातील बांधवांसह पणत्या रंगवून येथील बांधवांसाठी गाणी गाऊन व फळांचे वाटप करून दिवाळीचा आनंद साजरा केला.स्वराज पोलीस मित्र, पत्रकार स्वरक्षण आणि माहिती अधिकार संघटना गृप संघटनेच्या समुहानेही आश्रमातील बांधवांसह गाणी गाऊन व सहभोजन करून दीपावलीचा आनंद साजरा केला.
यावेळी समर्थ आश्रमातील बांधवांना जाणिवपुर्वक भेट देवून दीपावलीचा आनंद साजरा करणा-या सर्व युवक व नागरिकांचे समुह,संघटना यांचेसह वैयक्तिक व कौटुंबिक देणगीदारांच्या योगदाना बद्दल संदिप परब व विश्वस्त मंडळाने मनःपुर्वक आभार मानून त्यांच्या उत्स्फुर्त सहभागाचे स्वागत केले आहे.

error: Content is protected !!