पी.एस.आय. राजेंद्र गुरव लिखित दहावी नंतर पुढे काय? या मार्गदर्शक पुस्तकाच्या मोफत प्रतींचे वाटप

राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी कोणवडे यांच्या वतीने भुईबावडा केंद्रावरील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे केले वाटप

वैभववाडी (प्रतिनिधी) : आज वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा येथे दहावीच्या परीक्षा केंद्रावरती राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी कोणवडे चे संस्थापक राजेंद्र गुरव सर (पी.एस.आय) यांनी लिहिलेल्या दहावी नंतर पुढे काय?या पुस्तकाच्या तब्बल 120 प्रति एस.एस.सी. मार्च 2023 परीक्षेस प्रविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत वाटण्यात आल्या.

या कार्यक्रम प्रसंगी केंद्र संचालक शेंबवणेकर, उपकेंद्र संचालक कांबळे, उपकेंद्र संचालक व मुख्याध्यापक राठोड,भुईबावडा हायस्कूलचे मुख्याध्यापक भिसे, मांगवली हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक पाटील,नेर्ले हायस्कूलचे सूर्यवंशी,हेत हायस्कूलचे पांचाळ, केळवली हायस्कूलचे लाड, भुईबावडा हायस्कूलचे लिपिक वारे,नानिवडे हायस्कूलचे गुरव,जाधव तसेच कर्मचारी माने भाऊ, शिवगण भाऊ, भुजबळ भाऊ व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. त्याचप्रमाणे इतर केंद्रावरील अथवा शाळेतील दहावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक हवे असेल तर त्यांनी अथवा त्यांच्या शिक्षकांनी पाटील जे.के ( नेर्ले हायस्कूल, वैभववाडी) यांच्याशी 9403549444 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले आहे.

error: Content is protected !!