माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेबांना जेवणावरून उठवून अटक केली तेव्हा ठाकरेंचे संस्कार कुठे होते?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवावर टीका केली तेव्हा संस्कृती कुठे गेली होती?
उध्दव ठाकरे नी सुद्धा स्वतःच्या कृत्यांची माफी मागावी
भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी सुनावले
कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार आणि परंपरा या विषयांवर महिलांना शिवीगाळ करणाऱ्या संजय राजाराम राऊत यांनी तोंडचं उघडू नये. सदा भाऊ नी केलेल्या वक्तव्याच आम्ही समर्थन करत नाही. मात्र संस्कार,संस्कृती चे धडे राऊत नी स्वतःच्या मालकाला ही द्यावेत. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेबांना जेवणावरून उठवून अटक करण्याचे पाप केले होते. तेव्हा तुला संस्कृती आणि संस्कार दिसलें नाहीत ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नातवावर टीका केली तेव्हा परंपरा दिसली नाही काय ? मग कुठल्या तोंडाने तुम्ही आता बोलता. उद्धव ठाकरे ला कोणावरही बोलण्याची मुभा दिली आहे का ? उद्धव ठाकरे काही बोलला की ठाकरी भाषा आणि दुसरे कोण बोलले की संस्कार, संस्कृती काढता. सदा भाऊ खोत यांनी मोठ्या मनाने माफी मागितली तशी उद्धव ठाकरेंना माफी मागायला सांगा. अशा शब्दात भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांचा समाचार घेतला.ते कणकवली प्रहार भवन येथे पत्रकारांशी बोलत होते.
उबाठा ही मुस्लिम लीग ची बी टीम झालीय त्यांना हिंदूंची मते नको आहेत. त्यांना तनसे जुदा बोलणारे हिरवा गुलाल उडवीणारे हवेत. हम लुटणे देंगे नाही असे उध्दव ठाकरे बोलत आहेत. मात्र ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसता तेच कटेगे मध्ये पुढे आहेत. उध्दव ठाकरे आमच्या हिंदू धर्मगुरू आणि महंताना न भेटता मुल्लाचे आणि मौलविनचे पाय चाटायचे आहेत. पाकिस्तान जिंदाबाद नारे यांना द्याचे आहेत. त्यासाठी उध्दव ठाकरे यांचे हे सर्व चालले आहे.अशी टीका केली. भरत जोडो यात्रेत अर्बन नक्षलचा सिंहाचा वाटा होता याचे 100 पुरावे आम्ही देऊ शकतो. संजय राऊत अर्बन नक्षल आहे का ? याचा सर्वाधिक संशय आहे. योगी आदित्य नाथ योग्य सल्ला दिला आहे. काँग्रेस ची ज्या राज्यात सत्ता आहे. तिकडे काँग्रेस ने दिलेल्या गॅरंटीच काय झालं त्यांची गॅरंटी फसवी आहे. राहुल गांधींची गॅरंटी राहिली नाही. कर्नाटकची जनता आज पश्चाताप करतेय. खटाखट पैसे देणार होते ते कुठे गेले ? आता फटाफट तोंड बंद झालं. आमचे प्रत्येक योजनेचे पैसे भेटले लाडकी बहिण योजनेचे पाच महिन्यांचे पैसे आधीच भेटले होते आहेत.