मंगेश गावकर यांची शिवसेना (शिंदे गट) उपतालुका प्रमुख पदी निवड…!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर गावचे नेते मंगेश बाळा गावकर यांची मालवण उपतालुका प्रमुख पदी आज निवड करण्यात आली. कुंभारमाठ येथील निवास्थानी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख देवदत्त सामंत यांनी त्यांना उपतालुकाप्रमुख पदी नियुक्तीचे पत्र प्रदान केले.

यावेळी विधानसभा प्रमुख बबन शिंदे, उपजिल्हा प्रमुख राजा गावडे, तालुका प्रमुख महेश राणे, आचरा सरपंच जॅरोन फर्नांडिस, आचरा विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर, सोशल मिडिया प्रमुख मनोज हडकर, बाबू परुळेकर, बाबु कदम, बांदिवडे सरपंच आशु मयेकर, उपविभाग प्रमुख सतोष सावंत, अरविंद घाडी, चिंदर युवा सघटक, अमोल माळगावकर उद्योजक अभय भोसले, पकंज आचरेकर, महेश मांजरेकर आदी उपस्थित होते. मंगेश गावकर यांच्या निवडीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!