कणकवली (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीचे मशाल चिन्हावर निवडणूक लढवत असलेले शिवसेना उबाठा चे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारासाठी कनेडी बाजारपेठेत आज प्रचार फेरी काढण्यात आली.कनेडीचा आठवडा बाजार असल्यामुळे कनेडी दशक्रोशी तील ग्रामस्थ खरेदीसाठी आले होते.कनेडी येथील व्यापाऱ्यांकडून संदेश पारकर यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. घराणेशाही असलेला आमदार आणि गेल्या दहा वर्षात कोणत्याही प्रकारचा रोजगार येथे सामान्य माणसांना देऊ शकला नाही. फक्त इलेक्शन पुरत्या भुलथापा मारणाऱ्या आमदाराला कणकवली विधानसभा मतदारसंघातून हद्दपार केल्याशिवाय येथील व्यापारी गप्प बसणार नाहीत तर सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी कायमस्वरूपी उभे असलेल्या संदेश भाई पारकर यांना या प्रभागातून जास्तीत जास्त मतदान करण्याचा निश्चय करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीच्या शिवसेना उबाठा, राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.