लोरे नं १ मधील अपक्ष ग्रामपंचायत सदस्य जयदास तेली यांचा आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील लोरे नं १ अपक्ष ग्रामपंचायत सदस्य जयदास तेली यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केलाआहे.विकासासाठी कायम लोकसंपर्क असलेले आमदार नितेश राणे हेच नेते आहेत. त्याने विकासाची परंपरा कायम सुरू ठेवली असे मत प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केले आहे. यावेळी भाजपा पदाधिकारी तुळशीदास रावराणे, मनोज रावराणे, दिलीप तळेकर संतोष कानडे अजय रावराणे,अनमोल रावराणे इत्यादी उपस्थित होते.

error: Content is protected !!