भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री, जिल्हा सरचिटणीस प्रकाश मेस्त्री यांचा मालवण तालुका दौरा..!

प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटी गाटी घेत महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना मोठया मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन

आचरा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी ओबीसी जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री व जिल्हा सरचिटणीस प्रकाश मेस्त्री यांनी रविवार 10 नोव्हेंबर रोजी मालवण तालुक्यातील भाजप ओबीसी सेलच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटी गाटी घेत कुडाळ मालवण विधानसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. निलेश नारायण राणे यांना मोठया मताधिक्क्याने निवडून देण्याचे आवाहन केले. मोहन मेस्त्री, मोहन वराडकर,माजी नगरसेवका ममता वराडकर, शामसुंदर मेस्त्री यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांच्या त्यांनी यावेळी भेटी घेतल्या.

error: Content is protected !!