राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ हुमरठ व साकेडी मुस्लिमवाडीत घेतली बैठक

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी हुमरठ व साकेडी मुस्लिम वाडी येथील मुस्लिम बांधवांची बैठक आयोजित केली होती या बैठकीत जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आमदार नितेश राणे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी मदत केली पाहिजे त्यावेळी सर्व मुस्लीम बांधवांनी आमदार नितेश राणे यांना आम्ही मतदान करणार असे एकमुखी सांगितले या बैठकीला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,कणकवली राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य विलास गावकर्,शहर अध्यक्ष इम्रान शेख, युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडुलकर,जिल्हा प्रतिनिधी गणेश चौगुले, हुमरठ माजी उपसरपंच मुश्ताक काझी, साकेडी ग्रामपंचायत सदस्य जहुर शेख,सईद काझी, अकबर शेख ,अझहर शेख, दिलदार शेख, हनिफ काझी, केदार खोत, अनिकेत नाईक, व मुस्लिम बांधव उपस्थित होते

error: Content is protected !!