घडवू या इतिहास | परिवर्तनाची साथ |

फोंडाघाट बाजारपेठेत मशालीचा झंझावात !

संदेश पारकर यांच्या प्रचार फेरीस फोंडाघाट मध्ये महाविकास आघाडीसह मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : प्रचार संपण्याच्या पूर्वसंध्येला, सकाळी साडेअकरा वाजता, फोंडाघाट मध्ये संदेश पारकर यांच्या प्रचार फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते निशाणी धगधगत्या मशालीचा पट्टा गळ्यात घालून, फेरीमध्ये सहभागी झाले होते. महाविकास आघाडीचे राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष शरद पवार गटाचे स्थानिक नेत्यांनी सक्रिय सहभाग घेऊन आपला पाठिंबा जाहीरपणे दर्शविला. युनियन बँकेपासून बाजारपेठेच्या दुतर्फा, प्रत्येक घरोघरी जात,संदेश पारकर यांनी व्यापारी तसेच बाजारासाठी आलेल्या पंचक्रोशीतील तमाम ग्रामस्थ- मतदारांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा घेतल्या.

मतदारांनी फोंडाघाटचा आभासी विकास, भ्रष्टाचार, ठेकेदारांची मुजोरी,अरेरावी, दहशत आणि नेतृत्वहीन गावाच्या समस्यांचा पाढा वाचला. इतिहास घडवितांना परिवर्तनासाठी मशालीला साथ देण्याची सर्वांनी ग्वाही दिली. फेरीमध्ये अबाल -, महिला-पुरुष सहभागी झाले होते.

फेरीमध्ये संदेश पारकर सह माधवी दळवी, राजू रावराणे, आनंद मरये,संजना कोलते, प्रतिभा अवसरे, सुरेश टक्के, सुंदर पारकर, रंजन चिके,सिद्धेश राणे, प्रथमेश सावंत, श्रीकांत राणे,आबू पटेल,बाळा येलवकर, अनंत प़िळणकर, अनिल नानचे, बाळा कदम, रुपश नानचे,आनंद चिके, विजय जामदार, राजा पाटकर, श्याम भुवड, सुहास मोदी, रुपेश रेवडेकर, रमेश मेस्त्री, भाई पटेल, संजय सावंत,चंदू भालेकर, संतोष टक्के,आणि असंख्य मतदार- ग्रामस्थ सहभागी झाले होते.फोंडा बाजारपेठेतील प्रचारफेरी आटपुन संदेश पारकर,नारकर लोणचे फॅक्टरी, घोणसरी- लोरे येथे प्रचार फेरीसाठी रवाना झाले..

error: Content is protected !!