मालवण (प्रतिनिधी) : मालडी गावचे ग्रामदैवत श्री भावई देवी मंदिरात सालाबाद प्रमाणे यावर्षीही हरीनाम सप्ताह 26 नोव्हेंबर व 27 नोव्हेंबर रोजी अमाप उत्साहात भक्तिमय वातवरणात साजरा होणार आहे.तरी याचा लाभ माहेरवाशिणी,ग्रामस्थ ,भाविक यांनी घ्यावा असे आवाहन मालडी ग्रामस्थांनी केले आहे.दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण भावई मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.
हरिनाम सप्ताहाची सुरुवात 26 नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता होईल. यावेळी देवीची पूजा अभिषेक करून सारे विधी झाल्यावर देवीला मुकुट, साडी व दागिने घालून सजवली जाणार आहे.सकाळी मंत्रघोषात हरीनाम सप्ताह सुरू झाल्यावर देवीची आरती म्हणून सात प्रहराचा हरीनाम सप्ताह सुरू होईल.हरीनाम सप्ताह सुरु झाल्यावर देवींची खणानारळानी ओटी भरण्यासाठी सुहासिनीची रांग लागेल. अनेकजण नवस फेडण्यासाठी येतात. या वर्षी पंचक्रोशीतील जवळपास 20/22 भजनमंडळ आपापले नृत्यविष्कार सुश्राव्य अभंगा वर हर्मो नियम च्या तालावर आणि टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर सादर करतील. सप्ताहाच्या
पहिल्या रात्री भाविकांसाठी तसेच भजन कला मंडळातील सदस्यांना जेवणाची उत्कृष्ट सोय केली आहे.मध्यरात्री 12वाजता दिंडी काढली जाणार आहे. त्यामध्ये सामील होणे हे एक पुण्य समजले जाते आणि पाहणे सुद्धा भाग्य ठरते.
सकाळी 6 वाजता काकड आरती ,त्यानंतर 10वाजेपर्यंत गावातील लोक ठेका धरतील.10 वाजता भटजीनी उत्तर पूजा करून सप्ताह समाप्ती करतील. त्यानंतर देवालया भोवती पाच प्रदक्षिणा घालून महाआरती आणि महाप्रसाद दिला जाईल. त्यात खीर ही महत्वाचे आकर्षण असते.ग्रामस्थ आणि आलेल्या सर्व भाविकानी
महाप्रसादाचा लाभ घ्यावा.
दुसऱ्या दिवशी दुपारी महाप्रसाद होऊन हरीनाम सप्ताहाची सांगता होईल.
हा सप्ताहची रंगत अतिशय रंजक असते. तो यशस्वी बनविण्यात स्थनिक ग्रामस्थांनी अपार मेहनत आणि त्यास मुंबई स्थित ग्रामस्थांची योग्य साथ . सर्व ग्रामस्थांचा सहभाग वाखाणण्याजोगा असतो.











