देवगड (प्रतिनिधी) : दम्याचा आजाराला कंटाळून गवाणे वरचीवाडी येथील भिवा रामचंद्र जाधव(७५) या वृध्दाने घराच्या पडवीतच नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली.ही घटना १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते ९.३० वा.सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार गवाणे वरचीवाडी येथील भिवा रामचंद्र जाधव हे दमा आजाराने आजारी होते.१८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वा.सुमारास त्यांनी घराच्या पडवीतील लोखंडी खिडकीच्या पट्टीला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.याबाबतची खबर त्यांची पत्नी रत्नप्रभा भिवा जाधव(७०) यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली.पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून तपास पोलिस हवालदार आशिष कदम करीत आहेत.











