संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी वैभववाडी येथे रक्तदान शिबिर

वैभववाडी (प्रतिनिधी) : ७५ व्या संविधान दिनानिमित्त मंगळवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर व विविध उपक्रमाचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन वैभववाडी येथे करण्यात आले आहे.

भारतीय संविधान हे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकता व एकात्मता धर्मनिरपेक्षता, समाजवाद,लोकशाही,गणराज्य स्थापित करण्याचे महत्त्वपूर्ण साधन आहे. भारत देशाने हे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारले. यावर्षी या घटनेस 75 वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी सकाळी ८ ते ११ वाजता भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांनी बौध्द सेवा संघाच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सकाळी ११ते ११:३० अभिवादन व संविधान प्रस्ताविकेचे वाचन. सकाळी ११:३० ते १२ वा. संजय जाधव (उपप्रमुख अभियंता बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई) यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच दुपारी १२  वाजता भारताचे संविधान या विषयावर सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई पोलीस दल सतीश रावराणे मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाच्यावतीने काढण्यात आलेल्या वैभव पर्व दिनदर्शिका २०२५ चा प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती मुंबई अध्यक्ष यशवंत यादव,विशेष निमंत्रीत वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे उपस्थित राहणार आहेत. संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी व संविधानमूलक भारताच्या निर्मितीस योगदान देण्यास प्रतिज्ञाबद्ध होण्यासाठी कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाचे ग्रामीण अध्यक्ष भास्कर जाधव सचिव रवींद्र पवार कार्याध्यक्ष सुभाष कांबळे तसेच महिला मंडळाचे अध्यक्ष शारदा कांबळे सचिव रुचिता कदम कार्याध्यक्ष मोहिनी कांबळे यांनी केले आहे.

error: Content is protected !!