शिवसेना नेते संतोष कोदे यांनी मानले मतदारांचे आभार…..!
आचरा (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण मतदार संघांत उमेदवार निलेश राणे यांनी वैभव नाईक यांचा पराभव करत इतिहास घडवला आहे. यात आचरा विभागासह मालवण तालुक्याचाही सिहाचा वाटा आहे. निलेश राणे यांना चांगले मताधिक्य देत निवडून आणल्या बद्दल शिवसेना नेते संतोष कोदे यांनी मतदारांचे आभार मानले आहे.
आचरा, चिंदर, त्रिंबक, पळसंब, वायंगणी, तोंडवळी, तळाशील, बांदिवडे, कोईळ भागातून निलेश राणे यांना आमदार बनवण्यात मोलाची साथ देऊन चांगले मतदान केले आहे. निलेश राणे हे तळागाळातील जनतेचे आमदार म्हणून काम करणार असून गतिमान विकासासाठी प्रयत्न करतील असा विश्वास संतोष कोदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.












