माजी सभापती अरविंद रावराणे यांनी आमदार राणे बंधूंचे केले अभिनंदन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा मतदारसंघातून रेकॉर्डब्रेक 58 हजार मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल आमदार नितेश राणे आणि कुडाळ मालवण मतांदरसंघातून लक्षणीय विजय मिळविल्याबद्दल नवनिर्वाचित आमदार निलेश राणे यांचे वैभववाडी पं स चे माजी सभापती अरविंद रावराणे, माजी नगरसेवक संताजी रावराणे यांनी अभिनंदन केले.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत उपस्थित होते. वैभववाडी तालुक्यातील नितेश राणे यांना 10 हजारांचे लीड मिळेल आणि 50 हजारहून अधिक मतांनी नितेश राणे विजयाची हॅट्ट्रिक करतील असा अंदाज अरविंद रावराणे यांनी सांगितला होता.वैभववाडी तालुक्यातून नितेश राणे यांना लीड देण्यासाठी अरविंद रावराणे यांनी मेहनत घेतली होती.

error: Content is protected !!