विधानसभा निवडणुकीतील दैदिप्यमान यशाबद्दल राणे कुटुंबियांचे रघुनाथ नाईक यांनी केले अभिनंदन

कणकवली (प्रतिनिधी) : लोकसभेनंतर विधानसभा निवडणूकीत खासदार नारायण राणे यांचे दोन्ही सुपुत्र निलेश राणे आणि नितेश राणे यांनी एकाच वेळी अभूतपूर्व यश मिळवले. कणकवली विधानसभा मतदारसंघातून हॅट्ट्रिक साजरी करत नितेश राणे तर कुडाळ विधानसभा मतदारसंघात निलेश राणे यांनी अत्यंत प्रतिष्ठेचा विजय मिळवला. या दैदिप्यमान यशाबद्दल त्रिमूर्ती काँट्रॅक्टर्स चे सर्वेसर्वा रघुनाथ नाईक यांनी खासदार नारायण राणे, नीलम राणे, आमदार नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेत अभिनंदन केले. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेले मेडिकल कॉलेज, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, इंजिनिअरिंग कॉलेज, निलम्स कंट्रीसाईड्स हॉटेल, राणेंचा ओम गणेश बंगला आदी बांधकामे रघुनाथ नाईक यांनीच केली आहेत. राणे कुटुंबियांशी नाईक यांचेअत्यंत सलोख्याचे संबंध आहेत.

error: Content is protected !!