देवगड (प्रतिनिधी) : पडेल गावा मध्ये लोकसभेला सुद्धा आणि विधानसभेला सुद्धा देवगड तालुक्यात मध्ये सर्वात जास्त मतदान झाले. गेली दिड ते दोन वर्षात आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून पडेल गावामध्ये विकासाची गंगा आणण्यात आली.राणे आणि विकास याचे योग्य समीकरण पडेल येथे बघायला मिळाले. लोकसभेला १२५९ मते मिळाली असून विधानसभेला १४१६ मतदान संपूर्ण पडेल गावातून मिळाले.पडेल गावामधून ९४५ चे लिड आमदारसाहेबांना मिळाले.आमदार नितेश राणे यांच्या कार्या वर विश्वास ठेऊन मुंबईतून सुद्धा मतदार आले.त्याच प्रमाणे पडेल मंडळ अध्यक्ष बंड्या नरकर तसेच मंडळ प्रभारी अमोल तेली यांचे योग्य नियोजन आणि मार्गदर्शन यामुळे सर्व मतदारांचा विश्वास संपादन करण्यात यश आले.हे सर्वांच्या मेहनतीने मुळे शक्य झाले. या मध्ये पडेल गाव चे लोकनियुक्त सरपंच श्री भुषण पोकळे उप सरपंच विश्वनाथ पडेलकर, शक्ति केंद्र प्रमुख अंकुश ठुकरुल, भाजपा कृषी जिल्हा उपाध्यक्ष भुषण बोडस, जिल्हा बँक संचालक प्रकाश बोडस,माजी सरपंच संजय मूळम,विकास दिक्षित,शहरअध्यक्ष जयेश तानवडे,बूथ प्रमुख महेश मणचेकर, सुभाष घाडी, प्रभाकर वाडेकर, महिला पदाधिकारी अदिती तानवडे,शलाका तानवडे,गावातील प्रमुख पदाधिकारी, गावातील सर्व लाडक्या बहिणी,व सर्व ग्रामपंचायत सदस्य,वाडीप्रमुख,कार्यकर्ते,आणि सर्व ग्रामस्थ यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे
आमदार नितेश राणे यांना पडेल मधून ९४५ चे मताधिक्य












