6 महिने कारावास आणि दंडाची कणकवली न्यायालयाची शिक्षा जिल्हा न्यायालयाने केली कायम
सरकारी वकील गजानन तोडकरी यांचा आरोपी डॉक्टरला दणका
कणकवली (प्रतिनिधी) : तरुणीच्या विनयभंग प्रकरणी कणकवली न्यायालयाने आरोपी डॉक्टर जगन्नाथ मुकुंद नागवेकर याला दोषी धरून सहा महिने कारावास व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावलेली होती. सत्र न्यायालयात फौजदारी अपील 29/2015 दाखल करून स्थगिती मिळवलेली होती. सदरचे अपील जिल्हा सत्र न्यायाधीश २ श्रीमती देशमुख यांचे समोर चालले.अतिरिक्त सरकारी अभिक्ताता गजानन तोडकरी यांनी सरकारतर्फे बाजू मांडून आरोपीला खालील न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम करावी यासाठी युक्तिवाद केला. आज न्यायालयाने डॉक्टर जगन्नाथ नागवेकर याची शिक्षा कायम करून अपील डिसमिस केले. आज पुन्हा आरोपीने माननीय उच्च न्यायालयात जाण्याकरता शिक्षेस स्थगिती मिळावी याकरता अर्ज दिला त्या अर्जास सुद्धा गजानन तोडकरी यांनी तीव्र हरकत घेतली. न्यायालयाने आरोपीच्या शिक्षेस स्थगितीचा अर्ज देखील नामंजूर करून आरोपी डॉक्टर जगन्नाथ मुकुंद नागवेकर राहणार करंजे कणकवली याला पोलिसांच्या ताब्यात देऊन त्याची जेलमध्ये रवानगी केली.











