जामसंडेत विहीरीत उडी टाकून विवाहितेची आत्महत्या

देवगड (प्रतिनिधी) : जामसंडे शांतीनगर येथील संगीता संतोष कराडे(२८) या विवाहितेने विहीरीत उडी टाकून आत्महत्या केली. तिचा मृतदेह शनिवार दि.१८ मार्च रोजी रात्री ९ वाजता घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या विहीरीत सापडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, गीता कराडे ही जामसंडे शांतीनगर येथे पती व तीन मुलांसमवेत राहत होती. तिचे पती संतोष कराडे हे सेंटड्ढीग काम करीत असून शनिवारी सायंकाळी संगीता हिचे वडील व भाऊ मालवण येथून तिच्या घरी आले होते. रात्री ते जेवण करीत असताना अचानक गीता ही घरात दिसली नाही म्हणून तिचे पती, वडील, भाऊ व शेजारी यांनी शोधाशोध केली यावेळी रात्री ९ वा.सुमारास तिचा मृतदेह घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या विहीरीत सापडला. विहीरीत उडी टाकल्यामुळे विहीरीच्या पाण्यात बुडून मृत्यु झाला. याबाबतची खबर तिचा पती संतोष पांडूरंग कराडे यांनी दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. तपास पो.हे.कॉ.उदय शिरगावकर करीत आहेत.

error: Content is protected !!