भिरवंडे रामेश्वर मंदिरात होम मिनिस्टर स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी) : हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या दिवशी बुधवार दिनांक २२ मार्च रोजी स्मार्ट सुनबाई खेळ पैठणीचा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. श्रीदेव रामेश्वर मंदिर देवालय संचालक मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे होणाऱ्या होम मिनिस्टर स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना भेटवस्तू आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. ही स्पर्धा भिरवंडे गाव मर्यादित असून यात सहभाग घेण्यासाठी आपली नावे संदीप सावंत (दुकानदार) 9420206681 यांच्याकडे उद्या दिनांक २१ मार्च पर्यंत नोंदवावीत, असे आवाहन करण्यात येत आहे. नाव नोंदणी आवश्यक आहे. ऐनवेळी कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!