नामदार एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदी राहून जनतेचे प्रश्न सोडवावेत

शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी व्यक्त केल्या भावना

कणकवली (प्रतिनिधीं) : शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज होणाऱ्या शपथविधीमध्ये शपथ घेऊन सरकारमध्ये सक्रिय भूमिका बजावावी, ही संपूर्ण शिवसेना परिवाराची एकमुखी मागणी आहे.

शिवसेनेतील सर्व पदाधिकारी, नेते आणि शिवसैनिकांचे मत आहे की, साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या विकासाचे नवे अध्याय लिहिले जातील. त्यांच्या दूरदृष्टी आणि प्रगतीशील विचारसरणीच्या आधारे राज्यातील जनतेचे प्रश्न सुटतील आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल.

या संदर्भात शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि सर्व शिवसैनिकांची भावना मांडली. मुख्यमंत्री साहेबांनी ही मागणी मान्य करून आपले नेतृत्व कायम ठेवावे, हीच महाराष्ट्रातील जनतेची आणि शिवसैनिकांची अपेक्षा आहे.

error: Content is protected !!