आमदार साहेब मंत्रीपदासाठी शुभेच्छा

माजी सभापती प्रकाश सावंत, सामाजिक कार्यकर्ता अचित कदम यांनी अधिश बंगल्यावर आ.नितेश राणेंना दिल्या ऍडव्हान्स शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधीं) : आमदार साहेब मंत्रिपदासाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! माजी मुख्यमंत्री आदरणीय दादासाहेबांच्या नंतर तुमच्या रुपात वरवडे गावच्या सुपुत्राला राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळू दे अशा शब्दांत वरवडे गावचे सुपुत्र असलेल्या आमदार नितेश राणे यांना वरवडे गावचे कणकवली पं स चे माजी सभापती प्रकाश सावंत आणि वरवडे गावचे युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते अचित कदम यांनी शुभेच्छा दिल्या. मुंबई येथील राणेंच्या अधिश बंगल्यावर प्रकाश सावंत, अचित कदम यांनी आमदार नितेश राणे यांची गुरुवार 5 डिसेंबर रोजी सदिच्छा भेट घेतली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्यासह अन्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी आझाद मैदानावर होणार आहे. त्यानंतर येत्या 2 – 3 दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपा प्रवक्ते तथा विजयी हॅट्ट्रिक केलेले आमदार नितेश राणे यांचे स्थान पक्के आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश सावंत, अचित कदम यांनी मुंबईत आमदार नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेत मंत्रीपदासाठी शुभेच्छा दिल्या. विधानसभा निवडणूक निकाल लागायच्या आदल्या दिवशीच आमदार नितेश राणे यांच्या विजयाचे बॅनर वरवडे सह कणकवली तालुक्यात लावून अचित कदम यांनी एकच धमाका केला होता.

error: Content is protected !!