रत्नागिरी येथील गंधर्वरत्न प्रभूदेसाई स्मृती नाट्यगीत गायन स्पर्धेत

खारेपाटण हायस्कूलची विद्यार्थिनी कु.प्राजक्ता ठाकूरदेसाई हिने मिळविला द्वितीय क्रमांक

खारेपाटण (प्रतिनिधी) : प.पू.गगनगिरी महाराज भक्त मंडळ रत्नागिरी आणि स्वरभिषेक संस्था रत्नागिरी यांच्यावतीने सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यातील स्पर्धकासाठी रत्नागिरी येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई स्मृती नाट्यगीत गायन स्पर्धेत खारेपाटण येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयाची विद्यार्थिनी कु.प्राजक्ता अभय ठाकूर देसाई हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात असून तिच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. रत्नागिरी येथे संपन्न झालेल्या या नाट्यगीत गायन स्पर्धेकरिता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे हे सातवे वर्ष असून या स्पर्धे करीता रत्नागिरी येथील सुप्रसिध्द हार्मोनियम वादक विजय रानडे, सुप्रसिध्द शास्त्रीय गायिका संध्या सुर्वे, गायिका परब आदी मान्यवर उपस्थित होतें. तर या स्पर्धेचे परीक्षण मान्यवर परीक्षक गुरुराज गावकर (गोवा) व विराज गवस (गोवा) यांनी केले. खारेपाटण हायस्कूलची विद्यार्थिनी कु.प्राजक्ता ठाकूरदेसाई हिने या स्पर्धेत ‘मी पुन्हा वनांतरी’ हे बहारदार नाट्यगीत सादर करून प्रेक्षकांची व परीक्षकाची वाहवा मिळवली. तर कु. प्राजक्ता हिला खारेपाटण हायस्कूलचे संगीत शिक्षक संगीत अलंकार संदीप पेंडूरकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कु.प्राजक्ता हिच्या दैदिप्यमान यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे व सर्व संचालक मंडळ सदस्य तसेच शाळेचे मुख्याध्यापक संजय सानप व पर्यवेक्षक संतोष राऊत आणि शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे. तर कु.प्राजक्ता हीचा नुकताच शाळेच्या वतीने संस्था अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष भाऊ राणे, संचालक योगेश गोडवे, माजी संचालक हेमंत देवस्थळी, शाळेचे माजी कर्मचारी विजय कळत्रे, पर्यवेक्षक संतोष राऊत, संगीत शिक्षक संदीप पेंडुरकर आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!