“घाण्याचे तेल मनुष्याला आरोग्यदायी ” – प्राची ईसवलकर
खारेपाटण (प्रतिनिधी) : सध्याच्या युगात घाण्यावरचे तेल आरोग्यदायी आहे. तेली ज्ञाती बांधवानी आपला पारंपारिक व्यवसाय असलेला घाण्यावरचे तेल काढण्याचा व्यवसाय पुन्हा एकदा पुनर्जीवित केला तर समाजाची तर उन्नती होईलच असे प्रतिपादन खारेपाटण गावच्या सरपंच प्राची इसवलकर यांनी तेली ज्ञाती समाज बांधव व खारेपाटण ग्रामपंचायत यांच्यावतीने देव कपिलेश्वर सूर्यनारायण मंदिर खारेपाटण येथे संयुक्तरित्या आयोजित करण्यात आलेल्या संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०० व्या जयंती निमित्त स्नेह मेळवा कार्यक्रमात समाज बांधवांना मार्गदर्शन करताना केले. प्रारंभी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर तेली समाज मंडळाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार रमेश जामसांडेकर, कृषी अधिकारी गायत्री तेली, तुकाराम शेलार, श्रीधर गव्हाणकर, नारायण कदम, प्रभाकर कोळसूलकर, शशिकांत राणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मेळाव्याला मार्गदर्शन करताना शिक्षिका सुप्रिया झगडे म्हणाल्या की, मानवता हा धर्म श्रेष्ठ आहे. प्रत्येकावर दया करून माणूसकी जपली पाहिजे.तर “आपल्या संतानी किर्तनातून व अंभगातून लोक कल्याणाची शिकवण दिली आहे. त्यामुळे संत संताजी जगनाडे महाराज यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयात साजरी केली जाते. तसेच त्यांच्या स्मरनार्थ टपाल तिकीट देखील जारी केले आहे. अशी माहिती मेळाव्याच्या प्रमुख मार्गदर्शक अर्चना तळगावकर यांनी दिली.
खारेपाटणला ऐतिहासीक महत्व असून रट्ट राज्याच्या काळात तेली,माळी,ब्राम्हण,परिट इत्यादी लोक रट्टराज्याच्या बरोबर आले होते.असा उल्लेख ताम्रपटात आढळतो.तर पूर्वी पासून तेली समाज येथे राहत आहे.येथील सुर्याची मुर्ती भारतातील तीन प्रमुख सुर्यनारायण मुर्तीतील आहे. ज्ञाती बांधवानी पुढे येऊन या मंदिराचा जिर्णोद्धारचे कार्य हाती घेणे गरजेचे आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते रमेश जामसांडेकर यांनी यावेळी दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सचिव गणेश कृष्णा तेली, मनोहर उर्फ बबन तेली, किशोर धालवलकर, नारायण कोळसुळकर उदय जामसांडेकर, ब्रम्हा जामसांडेकर, चंद्रकांत झगडे, दिपक तेली, शोभा तेली, शाम कोळसुळकर, नाना झगडे, योगीता जामसांडेकर रुपाली जामसांडेकर, रुची जामसांडेकर यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना तळगावकर यांनी केले. सर्वाचे आभार सुप्रिया झगडे यांनी मानले .














