आमदार नितेश राणेंना मंत्रिपद ; कार्यकर्त्यानी गाठले नागपूर

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : आमदार नितेश राणे यांनी विजयाची हॅट्ट्रिक केल्यानंतर प्रथमच मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. आज सायंकाळी नागपूर मध्ये आमदार नितेश राणे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आमदार नितेश राणे यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी तयार राहा असा फोन केल्याचे समजताच थेट नागपूर मध्ये कार्यकर्त्यानी आमदार नितेश राणे यांची भेट घेत अभिनंदन केले. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, पडेल मंडल तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, देवगड तालुकाध्यक्ष राजू शेट्ये, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी नगराध्यक्ष मेघा गांगण, समीर प्रभुगावकर, कणकवली तालुका उपाध्यक्ष संदीप सावंत, कलमठ उपसंरपच स्वप्निल चिंदरकर, प्रज्वल वर्दम, भाजप युवा मोर्चा कणकवली तालुकाध्यक्ष सर्वेश दळवी, देवगड युवा मोर्चा शहराध्यक्ष दया पाटील, माजी नगरसेवक योगेश चांदोसकर, अमित साटम आदी पदाधिकारी, कार्यकर्ते नागपुरात पोचले असून याची देही याची डोळा आपल्या लाडक्या आमदार नितेश राणेंचा मंत्रिपद शपथसोहळा अनुभवणार आहेत.

error: Content is protected !!