खारेपाटण जि.प.विभागाच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार – मयुरेश लिंगायत
खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वचीत कॅबिनेट मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र नामदार नितेशजी राणे हे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिह्यात दि. २२ डिसेंबर २०२४ रोजी दाखल झाले. यावेळी त्यांचे जिल्हा व तालुका भाजप पक्षाच्या वतीने भव्यदिव्य असे स्वागत करण्यात आले. या शानदार कार्यक्रमाचे सुष्म व सुंदर ना भूतो न भविष्यती असे नियोजन करणारे कणकवली तालुका भाजप अध्यक्ष दिलीप तळेकर माजी अध्यक्ष संतोष कानडे तसेच माजी जि.प.वित्त व बांधकाम सभापती रवींद्र जठार व माजी पं.स.सभापती मनोज रावराणे, माजी जि.प.सदस्य संजय देसाई आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे खारेपाटण जि.प.मतदार संघ भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे सोशल मिडिया प्रमुख मयुरेश लिंगायत यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
भारतीय जनता पार्टीचे कोकणातील एकमेव कॅबिनेट मंत्री नामदार नितेश राणे यांचे भव्य दिव्य ऐतिहासिक असे स्वागत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे करण्यात आले होते.याकरिता ५१ जेसीबी,२ क्रेन सुमारे ३ टन पेक्षा अधिक फुलांची पुष्पवृष्टी,समई नृत्य, ढोल पथक वारकरी भजन, सुसज्ज स्टेज, रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक बॅनर व पक्षाच्या झेंड्याची सजावट रांगोळ्या व या व्यतिरिक्त कार्यक्रमात सहभागी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला. तसेच मंत्री महोदय नितेशजी राणे यांच्या स्वागतासाठी खारेपाटण येथे सकाळ पासूनच उपस्थित असलेल्या कार्यकर्ते याना पाणी नाश्ता याची व्यवस्था इत्यादी सर्व गोष्टींचे उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे जिल्ह्यात एवढा मोठा कार्यक्रम होऊ शकला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे खारेपाटण विभागाच्या जाहीर अभिनंदन व आभार व्यक्त करत असल्याचे सोशल मिडिया प्रमुख मयुरेश लिंगायत यांनी सांगितले.
खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघ विभाग हा नेहमीच माननीय राणे साहेब यांच्या पाठीशी राहिला असून प्रत्येक वेळी तो बालेकिल्ला राहिला आहे. तसेच प्रत्येक निवडणुकीत खारेपाटण विभाग हा सर्वात जास्त मतांचे लीड देणार विभाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात खारेपाटण विभागाची वेगळी ओळख आहे. त्यात भर म्हणून एवढं मोठा कार्यक्रम घडवून आणण्याची संधी या विभागाला मिळाल्यामुळे निश्चितपणे खारेपाटण विभागातील सर्व विकासकामे कॅबिनेट मंत्री नितेश राणे प्राधान्याने पूर्ण करतील. तसे पाहता राणे आणि खारेपाटण जिल्हा परिषद विभाग हे खूप वेगळच नात आहे. आणि त्यामुळे या विभागातोल उर्वरित सर्वच विकास कामे कॅबिनेट मंत्री नितेश राणे पूर्ण करतील असा विश्वास देखील सोशल मीडिया प्रमुख मयुरेश लिंगायत यांनी व्यक्त केला.












