खांबाळे बौध्दवाडी येथील आनंदी कांबळे यांचे निधन

वैभववाडी (प्रतिनिधी) : खांबाळे बौध्दवाडी येथील आनंदी काशीराम कांबळे वय ९२ यांचे वृद्धापकाळाने नुकतेच मुंबई येथे निधन झाले.परिसरात त्या नानी या नावाने परिचित होत्या. बौध्दजन पंचायत समिती मुंबई शाखा क्र. ८५५ चे अध्यक्ष प्रदीप कांबळे व सामाजिक कार्यकर्ते अरुण कांबळे यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या पश्चात सहा मुलगे, एक मुलगी, सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

error: Content is protected !!