डंपर ला दुचाकीची मागून धडक ; दोघे जखमी, एक गंभीर

कणकवली (प्रतिनिधी) : धावत्या डंपरला पाठीमागून येणाऱ्या दुचाकीवरून वाहतूक करत असलेले साहित्य लागल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार महेश भास्कर चाळके यांना किरकोळ तर कृष्णा राजाराम कळगुटकर (दोघेही रा. शिवडाव) यांना गंभीर दुखापत झाली. कृष्णा कळगुटकर यांच्यावर कणकवली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात मंगळवारी सकाळी ८.३० वा. च्या सुमारास कणकवली शिरवल मार्गावर शिवडाव फाटा येथे झाला. याप्रकरणी डंपर चालक आशिष आनंद मल्हार यांच्या फिर्यादीवरून दुचाकी स्वार महेश चाळके याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!