कुडाळ, त्रिंबक, चिंदर, आचरा मार्गे देवगड जाणारी एस. टी बस फेरी अनियमित
कुडाळ आगार व्यवस्थापकांना माजी सभापती अशोक बागवे, भाजप नेते प्रकाश मेस्त्री, पळसंब सरपंच महेश वरक यांच्या वतीने निवेदन
आचरा (प्रतिनिधी) : कुडाळ आगारातून संध्याकाळी 5 वाजता सुटणारी कुडाळ, कणकवली, त्रिंबक, चिंदर, आचरा मार्गे देवगडला जाणारी व सकाळी त्याच मार्गाने परत येणारी एस. टी बस फेरी गेलें अनेक दिवस अनियमित आहे. या गाडीवर अवलंबून असणाऱ्या विद्यार्थी, चाकरमानी, महिला, जेष्ठ नागरिक यांचे यामुळे हाल होतं आहेत.
आज कुडाळ आगार प्रमुख रोहित नाईक यांची माजी पंचायत समिती सभापती अशोक बागवे, भाजप नेते प्रकाश मेस्त्री, पळसंब सरपंच महेश वरक यांनी कुडाळ आगार येथे भेट घेत कुडाळ देवगड एस.टी बस फेरी अनियमित असल्याबाबत विचारणा केली संबंधित आगार व्यवस्थापकांनी उडवावडवीची उत्तरे दिली असता. त्यांना अशोक बागवे, प्रकाश मेस्त्री आणि महेश वरक यांनी चांगलेच धारेवर धरले. शेवटी आगार व्यवस्थापकाने नरमाईची भूमिका घेत. 4 दिवसात एस. टी बस नियमित करतो असे आश्वासन दिले.
यावेळी माजी पंचायत समिती सभापती अशोक बागवे, भाजप नेते प्रकाश मेस्त्री, पळसंब सरपंच महेश वरक यांच्यावतीने पळसंब, त्रिंबक, चिंदर प्रवासी, ग्रामस्थ यांच्या वतीने आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांना एक निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की कुडाळ, कणकवली, त्रिंबक, चिंदर, आचरा मार्गाने देवगडला जाणारी एस. टी बस फेरी नियमित झाली नाही तर कोणतीही पूर्व कल्पना न देता प्रवाशानकडून रास्ता रोको करण्यात येईल आणि याला आपण सर्वस्वी जबाबदार असाल.












