कलमठ सरपंच संदिप मेस्त्री यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरात७५ जणांचे रक्तदान

कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ सरपंच तथा भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत कलमठ श्री देव काशी कलेश्वर सभागृहात पार पडलेल्या रक्तदान शिबिरात ७५ रतकदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उदघाटन माजी पं स सदस्य महेश लाड यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप मेस्त्री यांची प्रमुख उपस्थिती होती. भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, महेश लाड, संतोष पुजारे, सागर राणे, नितीन पवार,पप्पू यादव, सुप्रिया मेस्त्री, तेजस लोकरे, स्वाती नारकर, दिनेश गोठणकर, श्रेयस चिंदरकर,पत्रकार राजन चव्हाण, गुरू वर्देकर मिलिंद गुरव, आबा कोरगावकर, मिलिंद चिंदरकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले.
दरवर्षी प्रमाणे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदात्यानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ७५ रक्तदात्यानी रक्तदान केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष तेजस लोकरे, नितीन पवार, समीर कवठणकर,श्रेयस चिंदरकर,परेश कांबळी, समीर ठाकूर ,स्वरूप कोरगावकर, समर्थ कोरगावकर, विराज मेस्त्री, सचिन वाघेश्री,अभी साटविलकर, विठ्ठल चव्हाण यांनी मेहनत घेतली. यावेळी मंडळाच्या वतीने संदिप मेस्त्री यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!