सोमवती निमित्त सोमवारी आंबडोस देव मोरयाचा धोंडा येथे तीर्थ स्नानासाठी जाणार

भक्तांना लाभ घेण्याचे आवाहन

ओरोस (प्रतिनिधी) : सोमवार ३० डिसेंबर रोजी सोमवती अमावास्या दिवशी तिर्थस्नानाचा योग आहे. या दिवशी श्री देव रवळनाथ पंचायतन आंबडोस मधील सर्व देव देवता तरंग, पालखी सहित व गावातील सर्व लोकासहित मालवण समुद्र किनारी येथे प्रसिद्ध असलेल्या मोरयाचा धोंडा या ठिकाणी तीर्थ स्नानासाठी जाणार आहे. आंबडोस रवळनाथ मंदिर येथून सकाळी सात वाजता प्रस्थान केल्यानंतर नांदरूख येथील श्री देव गिरोबा देवाची भेट घेवून आनंदव्हाळ कुंभारमाठ मार्गे देऊळवाडा येथील श्री देव नारायण मंदिर येथे परंपरेने विश्रांती घेवून अर्ध्या तासानंतर देवाचा पारंपारिक भाग गाड पाणंद येथून गावकरवाडी मार्गे मोरयाच्या धोंडा येथे तिर्थ स्नानासाठी जातील. त्या ठिकाणी, गणेशपूजन करून प्रथम देव स्नान करतील. नंतर भाविक ग्रामस्थ स्नान करून त्याच मार्गे देऊळवाडा नारायण मंदिर येथे येतील. श्री देव नारायण याला नैवैद्य दाखवून प्रसादाचा कार्यक्रम होईल. येथे काही वेळ विश्रांती घेवून आलेल्या मार्गाने परत सायंकाळ पर्यंत आंबडोस रवळनाथ मंदिर मुक्कामी येतील. तरी सर्व भाविक भक्तानी व ग्रामस्थानी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मानकरी वर्ग, ग्रामस्थ, रवळनाथ मदिर पंचायतन यांच्यावतीने विनंती करण्यात आली आहे.

error: Content is protected !!