जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा फोंडा सुतारवाडी येथे संगणक प्रदान कार्यक्रम संपन्न !

प्रत्येक विद्यार्थ्याला संगणक ज्ञान असणे आवश्यक – पटेल

कै. सत्यवान लाड यांचे स्मरणार्थ दिपक सत्यवान लाड, महेश सत्यवान लाड, सचिन सत्यवान लाड यांजकडून शाळेला दोन संगणक संच !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : शाळेच्या नवीन अभ्यासक्रमानुसार संगणक ज्ञान असणे प्रत्येक मुलासाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी कृषी सभापती व विद्यमान शिवसेना कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा प्रमुख संदेश पटेल यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना काढले. प्रथमतः मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सावंत यांनी केले. आणि प्रशालेला देणगी स्वरूपात संगणक दिल्याबद्दल लाड कुटुंबियांचे आभार मानले. मान्यवरांचे हस्ते दिपक लाड, महेश लाड, सचिन लाड यांचा शाळेला संगणक दिल्याबद्दल शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संदेश पटेल माजी कृषी सभापती यांचा कार्यक्रमाच्या दिवशी वाढदिवस असल्याने सर्व मान्यवर शिक्षक, ग्रामस्थ- पालक- विद्यार्थी यांच्याकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. संगणक दाते महेश लाड यांनी सुद्धा, आपल्या शाळेतील मुलांना डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी संगणक प्रदान केले असल्याचे सांगितले व शाळेप्रती आपले कर्तव्य निभावले असल्याचे सांगितले. मान्यवरांचे व ग्रामस्थांचे स्वागत निलेश कडूलकर यांनी केले. सदरच्या संगणक प्रदान कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या सौ स्नेहलता पांचाळ, किशोर लाड, हनुमंत लाड, लक्ष्मण लाड, गुरुनाथ मेस्त्री, प्रिति फोंडेकर, साक्षी पाताडे, मानसी लाड, विशाखा लाड, संजना लाड, गौरी फोंडेकर, ज्योत्स्ना लाड, श्रीमती भारती गुरव व विद्यार्थी उपस्थित होते. प्रशालेच्या पदवीधर शिक्षिका दर्शना हुंबे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकल्याने फोनद्वारे संगणक दात्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशालेचे उपशिक्षक श्रीकृष्ण ठाणेकर यांनी मानले. या कार्यक्रमाला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्यांनी समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!