महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीत सावित्रीबाई फुलेंचे मोठे योगदान- जयेंद्र रावराणे
सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतील विद्यार्थीनींनी वेधले साऱ्यांचे लक्ष
वैभववाडी (प्रतिनिधी) : ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरी केली जात आहे. वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल मध्ये महिला शिक्षिकांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमा पुजन करून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी अनुष्का हावळ, ईश्वरी रावराणे, श्रावणी सुतार या विद्यार्थीनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या त्या या कार्यक्रमाचे आकर्षण ठरल्या. परी नेवरेकर या विद्यार्थीनीने कार्यक्रम प्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी आपले विचार मांडले. तर महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीत सावित्रीबाई फुलेंचे मोठे योगदान आहे असे मत वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यावेळी व्यक्त केले. प्रशालेचे क्रीडा शिक्षक एन.सी.सी ऑफिसर एस.टी.तुळसणकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करणारे गीत सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख व्ही.एस.मरळकर, पी.बी.पवार, सर्व शिक्षक शिक्षीका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













