युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या मागणीला यश

कणकवली शहरातील मराठा मंडळ व कणकनगर येथील केटी बंधाऱ्याला लोखंडी प्लेट घालण्यास सुरवात

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील मराठा मंडळ जवळील व कणकनगर येथील केटी बंधाऱ्याला लवकरात लवकर लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवा अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लघु पाटबंधारे विभागाकडे काही दिवसापूर्वी केली होती. या मागणी ची दखल घेत आज पासून या केटी बंधाऱ्याला लोखंडी प्लेट टाकण्यास सुरवात करण्यात आली आहे. या प्लेट टाकल्यामुळे वाहून जाणारे पाणी भरपूर प्रमाणात अडवण्यात येणार आहे. याचा फायदा कणकवली शहरातील जलस्रोतांना होणार आहे.

error: Content is protected !!