मत्सोद्योग मंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर दिव्यांग प्रमोद सोनसुकरे शासकीय सेवेत नियुक्ती

सोनसुकरे यांनी 24 दिवस सुरू ठेवलेले सहकुटुंब आंदोलन घेतले मागे

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शिक्षण संस्थेकडून झालेल्या अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी प्रमोद सोनसुकरे यांनी गेले २४ दिवस जिल्हा परिषदसमोर सुरू केलेले आंदोलन अखेर नियुक्तीपत्र मिळाल्याने आज थांबविले शारीरिक दृष्ट्या अपंग असलेल्या प्रमोद मोहनराव सोनसुकरे यांना शासनाने पुनर्नियुक्तीचे आदेश देऊनही शिक्षणविभाग आणि शिक्षण संस्थेकडून नियुक्ती देण्यास टाळाटाळ केली जात होती. या विरोधात जिल्हा परिषद प्रवेशद्वारा समोर गेले २४ दिवस प्रमोद सोनकुसरे यांनी कुटुंबासमवेत बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली होती. तर गेले तिन दिवस त्यांनी बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. याची दाखल घेत मत्स्योद्योग बंदर विकासमंत्री नितेश राणे यांनी संबंधित संस्था आणि शिक्षणाधिकारी यांना आदेश देत सोनकुसरे याना तात्काळ सेवेत घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज शिक्षणविभाग आणि संबंधित संस्थेने नेमणूकीचे पत्र दील्याने प्रमोद सोनसुरकर यांनी माजी पं.स. सदस्या सामाजीक कार्यकत्या सुप्रिया वालावलकर यांच्याहस्ते नियुक्ती पत्र घेऊन आपले उपोषण संपविले. यावेळी ऑर्गनाईज फॉर राईट ऑफ ह्यूमन संस्थेचे पदाधिकारी गजेंद्र पौनीकर, नंदा राणे, स्वाती रोडे, सुनंदा फुकट, प्रमोद नंदनवार, लता नंदनवार, ज्योती सोनसुकरे उपस्थित होते.

error: Content is protected !!