मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी, ग्रामपंचायत कडून यथोचित सहकार्य ! – सरपंच संजना आग्रे

फोंडाघाट ग्रामपंचायत कडून नेत्रचिकित्सा शिबिराचे नियोजन ; लवकरच ३० रुग्णांवर अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट पंचक्रोशीतील गरजू व गरीब महिला- पुरुषांसाठी तसेच शालेय मुला-मुलींसाठी विवेकानंद नेत्रालय आणि फोंडाघाट ग्रामपंचायत मार्फत,शिवाजी सभागृहात नेत्रचिकित्सा शिबिर नुकतेच पार पडले. यावेळी बोलताना सरपंच संजना आग्रे यांनी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी, ज्यांना डोळ्याचे आजार, दृष्टीदोष अथवा मोतीबिंदू इत्यादी विकार असतील तर,त्यांचे साठी मोफत नेत्रचिकित्साचा शिबिर आयोजित केले आहे.यातून मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी, कणकवली विवेकानंद नेत्रालय येथे अल्प दरात शस्त्रक्रियेसाठी जाणाऱ्या, रुग्णांना मोफत प्रवासाची सोय करण्यात येईल असे सांगितले…

विवेकानंद नेत्र रुग्णालयाचे नेत्रचिकित्सक स्नेहल पाटणे, आरोग्य सेविका प्राची चव्हाण व सहकारी जगदाळे यांनी सुमारे ८० रुग्णांची तपासणी करून त्यातील 30 जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड केली. इतर रुग्णांना अल्प दरात चष्मा वाटप करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील रुग्णांसह ग्रामपंचायतीचे सदस्य शिबिरासाठी उपस्थित होते

error: Content is protected !!