आभाळमाया ग्रुपतर्फे वराड येथील प्रथम क्लिनिकला ECG मशीन सुपूर्द

हॉटेल व्यावसायिक संजय गावडे यांचे सहकार्य
चौके ( प्रतिनिधी ): गुरुवार दिनांक २३ मार्च रोजी श्री. स्वामी समर्थ महाराज प्रकटदिनाचे औचित्य साधून आभाळमाया ग्रुपचे सदस्य आणि मालवण येथील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक श्री. संजय गावडे यांच्या सहकार्याने वराड गावातील प्रसिद्ध डॉक्टर आणि कोरोना काळात कट्टा पंचक्रोशतील कोरोना बाधित रुग्णांना सेवा देणाऱ्या कोरोनायोद्धा डॉ. प्रथमेश वालावलकर यांच्या प्रथम क्लिनिकला कट्टा पंचक्रोशीतील जनतेच्या आरोग्यविषयक अत्यावश्यक सेवेसाठी ECG मशीन सुपूर्द करण्यात आली. कट्टा पंचक्रोशीत ही सेवा फक्त डॉ. खाडिलकर यांच्याकडे उपलब्ध होती आता ही सेवा वराड येथे प्रथम क्लिनिक येथे सुद्धा उपलब्ध असेल.
या कार्यासाठी आभाळमाया ग्रुपचे सदस्य सावंतवाडी नगरपालिका मुख्याधिकारी जयंत जावडेकर , डॉ. संजय नवांगुळ , ॲड. प्रदीप मीठबावकर, श्री. समीर रावले, श्री. नितीन शेट्ये, शुभम मसुरेकर, श्री. जगदीश परब या ग्रुप सदस्यांचे सहकार्य लाभले. श्री. संजय गावडे यांचे किल्ले संवर्धन, रक्तदान चळवळ, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. त्यांच्या या वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक कार्याबद्दल वराड ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त केले जात आहेत.

error: Content is protected !!