भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांची आमदार नितेश राणे व नगराध्यक्ष यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
वैभववाडी (प्रतिनिधी): वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र आणि मौजे सडुरे येथील मुळ रहिवासी हुतात्मा मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार रावराणे हे दि.०७-०८-२०१८ रोजी अतिरेक्यांशी लढताना शहीद झाले. त्यांचे कायमस्वरूपी स्मरण व्हावे या उद्देशाने वैभववाडी येथील दत्त मंदिर चौकात वैभववाडी नगरपंचायतच्या हद्दीतील वैभववाडी – नावळे- सडुरे रस्त्यावर त्यांच्या नावाने भव्य प्रवेशद्वार उभारण्यात यावे तसेच वैभववाडी – सडुरे या न.प.अखत्यारीत असलेल्या रस्त्याला हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी आमदार नितेश राणे व नगराध्यक्ष वाभवे वैभववाडी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.













